करोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील

करोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.

मुख्यमंत्री काय म्हणाले...

- खासगी वाहने अत्यावश्यक कारण असेल तरच सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.

- कालपासून इतर राज्यांच्या सीमा बंद केल्या होत्या आजपासून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात येत आहेत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली.

- देशांतर्गत विमानसेवा तत्काळ बंद करावी, अशी विनंती पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

- जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरू राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंसाठीचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील.

- सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील.

- आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय सेवेत हातभार मिळावा म्हणून प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यात येत आहे.

- सर्व माध्यमांनी करोनाविषयी जनजागृती करावी.

- ज्यांना करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

- घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Aarogya Setu a step against CORONA (COVID-19)

‘Metallic wood’ has the strength of titanium and the density of water